आज म्हणजेच शुक्रवारी या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट '83' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या क्रिकेट विश्वचषक विजयाला समर्पित आहे. त्यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत मिळून रणवीरने खास दैनिक भास्करसोबत चित्रपटाशी संबंधित रंजक माहिती शेअर केली आहे -
प्रश्न- '83' सिनेरसिकांच्या पसंतीस पडला आहे. याच्या मेकिंगमधील सर्वात आव्हानात्मक आणि सर्वात स्मूद पार्ट कोणता होता?
कबीर: अनेक आव्हानात्मक भाग होते. त्यावेळच्या खेळाडूंना फिजिकली रिक्रिएट करणे ही सर्वात कठीण बाब होती. 14 अभिनेते कसे निवडायचे जे प्रतिष्ठित खेळाडूंची बॉलिंग अॅक्शन, बॅटिंग स्टांस, संवाद इत्यादींचे प्रतिनिधित्व करू शकतील? त्या काळातील भावना पुन्हा कशा रिकॅप्टर कराव्या हे आमच्यासाठी आव्हान होते.
रणवीर :- कबीर, तुम्ही हे सगळं कसे केले? ही जादू आहे. तो जोश पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रेक्षकांना जाणवेल. आतापर्यंत झालेल्या स्क्रिनिंगमध्ये लोक हसले आणि रडलेदेखील. उठून टाळ्या, शिट्ट्या वाजवल्या. थिएटर्सचे स्टेडियममध्ये रूपांतर होत आहे. आम्हाला तेच हवे होते. मला कबीर सरांचे कौतुक करायचे आहे. कारण असा चित्रपट बनवणे खूप अवघड आहे. कारण ती खूप मोठी कथा आहे. दृश्ये, पटकथा, त्यांची अंमलबजावणी, सर्वकाही यात बरेच काम केले गेले. हा त्या खेळाडूंचा आशीर्वादच आहे की हा चित्रपट इतका चांगला बनला आहे. ही एक वेगळीच जादू आहे. माझ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मला हे पहिल्यांदाच जाणवले.
प्रश्न- जेव्हा तू स्वतःला कपिल देव म्हणून पहिले तेव्हा काय भावना होती?
रणवीर :- हे सर्व सहजासहजी आले नाही. खरं सांगायचे तर सुमारे 60 ते 70 तास कबीर सर आणि मी विक्रम गायकवाड सरांसोबत मेकअपवर काम करत होतो. दरदिवशी आम्ही सहा ते आठ तास मेकअपवर काम करायचो. त्यानंतर आठवडाभराच्या अथक परिश्रमानंतर आम्ही अंतिम लूकवर आलो. तरीही कबीर सरांची इच्छा होती की जास्त लोडिंग होऊ नये. कबीर सरांना प्रोस्थेटिकचा कमीत कमी वापर हवा होता, कारण 14-14 तास आम्ही शूटसाठी क्रिकेट खेळायचो. गोलंदाजी आणि फिल्डिंग करावे लागले. अशा स्थितीत जर ते अधिक घेतले असते तर ते माझ्यासाठी दुःस्वप्न ठरले असते. त्यामुळे कमीत कमी मेकअप त्यांना हवा होता. होय, त्वचेचा रंग बदलला. तसेही ट्रेनिंग आणि शूटिंगमुळे रंग बदलत होता. मिशा माझ्या ओरिजिनल होत्या. फक्त दोन गोष्टींची गरज पडली एक दात आणि दुसरे केस.
प्रश्न- तुम्ही अगदी कपिल देव यांच्यासारखा आवाज काढला. ते कसे केले?
रणवीर: कबीर सर आणि मी होमवर्क करायला कपिल सरांकडे दिल्लीला गेलो होतो. दोन आठवडे त्यांच्यासोबत तिथे राहिलो. रोज तीन-चार तास बसून त्यांचे ऐकत असे. त्या दरम्यान मी त्यांचा आवाज कसा आहे, त्याचे निरिक्षण केले. त्यांचा टोन कसा आहे?, हे आत्मसात केले. हे सर्व मला दोन आठवड्यांत समजले. पण हे तसे वरवरचे होते. सामन्यादरम्यान कोणता विचार करून ते कोणता निर्णय घ्यायचे, हे सर्व जाणून घेणेही खूप गरजेचे होते.
प्रश्न- त्यांना इंटर्नलाइझ करण्यासाठी तुला किती वेळ लागला?
रणवीर:- दोन आठवडे त्यांच्या घरी पाहुणा म्हणून राहिलो. आम्ही सकाळी क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायचो. त्यानंतर त्याचं ऑफिस असायचं. त्यानंतर लंच ब्रेक व्हायचा. संध्याकाळी फिजिकल कंडिशनिंग करायचो. तोपर्यंत ते परत यायचे. मग कबीर सर आणि मी बसून जेवण करायचो. सोफ्यावर बसून गप्पा मारायच्या. त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र बसायचे. एवढ्या वर्षात कपिल सर स्वतः स्टोरी टेलर बनले होते. ते स्वतः सर्व काही मोकळेपणाने सांगायचे. त्या दोन आठवड्यांच्या वास्तव्यात माझी त्यांच्याशी ओळख झाली.
प्रश्न- म्हणजे आता कपिल सरांचा बायोपिक बनणार नाही का?
कबीर:- आम्ही त्याचा विचार करु, पण त्यांचे जीवन, करिअर एक गौरवशाली चॅप्टर आहे, अर्थातच त्यांच्या जीवनात अनेक हाईज आहेत, परंतु ते स्वतः म्हणतात की 83 ही त्यांची क्राउनिंग ग्लोरी आहे. त्या वर्षी त्या विजयांने संपूर्ण देशाचा आणि जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे सध्या नक्कीच त्यांच्या बायोपिकचा विचार करू शकत नाही. सध्या तुम्ही सगळे फक्त या चित्रपटाचा आनंद घ्या. पुढे आठ-दहा वर्षांनंतर कदाचित आपण त्यांच्या बायोपिकचाही विचार करू.
रणवीर तुला या काळातील जादूगार अभिनेता म्हटले जाते, स्वत: तू ते पात्र जगत असतो. तुला कोणाचा बायोपिक करायला आवडेल?
कबीर : मी त्याला गिरगिट म्हणतो. रणवीर :- हा तुम्हा सर्वांच्या मनाचा मोठेपणा आहे.
प्रश्न- हे आम्ही तुला बेफिक्रेच्या वेळीही सांगितले होते. वरून तू मस्तीखोर आणि अतरंगी फॅशन सेन्स असलेली व्यक्ती दिसत असली तरी प्रत्यक्षात तू प्रत्येक सेकंदाला तुझ्या क्राफ्टबद्दल विचार करत असतो. तू थिंक टँक असलेले अभिनेता आहेस? आता तुला कोणत्या पर्सनॅलिटीचा बायोपिक करायला आवडेल?
रणवीर :- हो. मी तीच थिंक टँक माझ्या आत लपवण्यासाठी सो कॉल्ड अतरंगी कपडे परिधान करत असतो. मात्र, आणखी एक मोठे व्यक्तिमत्त्व आहे, त्याच्यावर बायोपिक करायचा आहे. तो माझ्या मनात आहे. पण मी तुम्हाला त्याचे नाव आणि त्याच्याबद्दल भविष्यात सांगेल.
प्रश्न- क्रिकेटर की राजकारणी?
रणवीर :- खूप महान माणूस. खूप मनोरंजक लोक. ते फक्त माझ्या हृदयात आणि मनात आहे. असे बरेचदा घडते, जेव्हा आपण एखाद्या संभाव्यतेचा विचार करतो की त्या पात्राला विशेष बज मिळेल तेव्हा मजा येते.
Post a Comment