0

 मुंबई आणि दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच संसर्गामध्ये अचानक वाढ झाली आहे. शनिवारी पुन्हा एकदा मुंबईत 757 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 24 जूननंतर मुंबईतील संसर्गाची ही सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी गुरुवार आणि शुक्रवारी येथे 600 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

इकडे दिल्लीतही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नवीन रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. शुक्रवारी येथे कोरोनाचे 249 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 6 महिन्यांनंतर येथे 38% वाढ झाली आहे. शुक्रवारी देखील येथे 180 प्रकरणे नोंदवली गेली.

महाराष्ट्रात आजपासून नवे निर्बंध
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्रात आजपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत राज्यातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल, असे सरकारकडून कठोरपणे सांगण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांना 50,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

Post a Comment

 
Top