भारत आणि चीन यांच्यातील व्यापार या वर्षी विक्रमी पातळीवर पोहोचला. एक जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दोन्ही देशांत एकूण ८.५७ लाख रुपयांचा व्यापार झाला, तो गेल्या पूर्ण वर्षाच्या तुलनेत ४६.४% जास्त आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ११ महिन्यांत भारताने चीनकडून ६.५९ लाख कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या, ही खरेदी गेल्या वर्षाच्या तुलनेत ४९% जास्त आहे. दुसरीकडे, चीनने भारताकडून एकूण १.९८ लाख कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या, ही खरेदी गेल्या वर्षाच्या तुलनेत ३८.५% जास्त आहे. म्हणजे व्यापार तूट ४.६१ लाख कोटी झाली असून ती आतापर्यंतची सर्वाधिक आहे. दोन्ही देशांतील विक्रमी व्यापाराचा हा आकडा जगाला आश्चर्यचकित करणारा आहे. कारण गेल्या वर्षापासून दोन्ही देशांत एलएसीवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंकडून ५०-५० हजारपेक्षा जास्त सैनिक तैनात आहेत. ही संख्या १९६२ च्या युद्धानंतर सर्वाधिक आहे.
सीमावादावरून कमांडर पातळीच्या १२ चर्चा अयशस्वी ठरूनही दोन्ही देशांत विदेश मंत्रालय स्तरावरील समन्वय कायम आहे. चिनी सरकारद्वारे जारी व्यापार आकड्यांनुसार, २०२१ हे वर्ष भारतासोबतच्या व्यापाराच्या दृष्टीने चीनसाठी अत्यंत चांगले ठरले. व्यापार वाढवण्यासाठी दोन्ही देश हाय लेव्हल इकॉनॉमिक अँड ट्रेड डायलॉगसाठी (एचईटीडी) राजी झाले आहेत. त्यात भारताचे परराष्ट्रमंत्री आणि चीनच्या उपपंतप्रधानांचा समावेश आहे.
Post a Comment