1983 मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. तोच सोनेरी क्षण चित्रपट दिग्दर्शक कबीर रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. याच चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीझ झाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या कधीही न पाहिलेल्या बॅटिंगची झलक दाखवण्यात आली आहे.
कपिल देव यांनी झिम्बाब्वेच्या विरोधात 175 धावा ठोकल्या होत्या. खेळीमुळे भारताने केवळ मॅचच जिंकली असे नाही. प्रत्यक्षात त्यावेळी भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर होता. परंतु, कपिल देव यांच्या बॅटिंगमुळे भारताला पुन्हा स्पर्धेत सामावून घेण्यात आले.
आंघोळ करत होते, झटपट तयार होऊन मैदानावर आले कपिल
1983 च्या क्रिकेट विश्वचषकात झिम्बाब्वेच्या विरोधात भारताकडे करा किंवा मरा अशी परिस्थिती होती. भारताने ही मॅच हारल्यास वर्ल्ड कप तर सोडा सिरीझमधूनच बाहेर पडावे लागले असते. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सुरुवातीलाच एकानंतर एक विकेट पडण्यास सुरुवात झाली.
17 धावांपर्यंत भारताचे 5 फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतरच कपिल देव फलंदाजीसाठी मैदानात उतरले. त्यांनी केवळ 138 चेंडूंमध्ये 175 धावा ठोकल्या. यामध्ये तब्बल 16 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्या काळात कुठल्याही बॅट्समनने केलेला हा बेस्ट परफॉर्मन्स होता. विशेष म्हणजे, भारताच्या 5 विकेट पडल्या तेव्हा कपिल देव शावर घेत होते. अंगावर साबण तसाच होता. कपिल देव यांना हाक मारण्यात आली तेव्हा ते तसेच झटपट तयार होऊन मैदानावर उतरले होते.
हाच क्षण आणि त्यानंतर झालेली बॅटिंग यांची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
Post a Comment