तुम्ही जर निवृत्तीवेतनधारक (Retired Employee Pension) असाल, किंवा तुमच्या घरामधील कुणी निवृत्तीवेतनधारकांपैकी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Jeevan Pramaan Patra) हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही जीवन प्रमाणपत्र अनेक प्रकारे सबमिट करू शकता. तुम्ही ट्रेझरी, बँक शाखा, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि पोस्ट ऑफिसला भेट देऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. सरकारी पेन्शनधारकांसाठी वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे.
विशेष म्हणजे सरकारी पेन्शनधारकांना त्यांचे निवृत्ती वेतन कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. जीवन प्रमाणपत्र सादर केल्यावरच पेन्शनधारक हयात आहेत की नाही हे समजते.
Post a Comment