0

 कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाला आहे. राजस्थानात 7 दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एकाच कुटुंबातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यात पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. सर्वांचे नमुणे जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सोबत खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

चिंतेची बाब म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या या कुटुंबाने 12 नातेवाइकांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यातील 5 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 16 वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. राजस्थानच्या यूनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स (RUHS) चे अधीक्षक अजित शेखावत यांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वांना ओमायक्रॉन संशयित माणून क्वारंटाइन करण्यात आले आहे. सोबतच, त्यांचे घशाचे नमुणे जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यातूनच कोरोनाच्या व्हेरिएंटचा पत्ता लागतो.

मुंबईला पोहोचलेल्या 9 परदेशींसह 10 जण संक्रमित
मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 9 परदेशी नागरिकांसह एकूण 10 जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. हे सगळेच 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. मुंबई महापालिकेने त्यांचे नमुणे जीनोम सीक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठवले आहेत.

बंगळुरूत डॉक्टरसह 6 जणांना ओमायक्रॉनचे संक्रमण
तत्पूर्वी गुरुवारी कर्नाटकात देशातील पहिल्या ओमायक्रॉनचे संक्रमणाची दोन प्रकरणे सापडली. त्यामध्ये एक 66 वर्षीय परदेशी नागरिक आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. तर दुसरी व्यक्ती बंगळुरूतील 46 वर्षीय आरोग्य कर्मचारी आहे. दोघांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. यासोबतच परदेशी नागरिकाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आङेत. त्या सर्वांना ओमायक्रॉनची लागण झाली का याचा पत्ता लावला जात आहे.

विशेष म्हणजे, बंगळुरूत ज्या परदेशी नागरिकाच्या नमुण्यात ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडला, तो 27 नोव्हेंबर रोजी दुबईला सुद्धा जाऊन आला आहे. बंगळुरू महानगरपालिकेने त्याची ट्रव्हेल हिस्ट्री जाहीर केली. या परदेशी नागरिकाने कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले होते. 20 नोव्हेंबर रोजी बंगळुरूत पोहोचला तेव्हा त्याची विमानतळावरच RT-PCR चाचणी करण्यात आली होती.

Post a Comment

 
Top