विराटने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला जबाबदारी देण्यात आली असे आतापर्यंत सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात टीम इंडियाचे कर्णधार पद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीचा नव्हताच. त्याला या पदावरून चक्क अल्टिमेटम देऊन हटवण्यात आले आहे.
बीसीसीआयने विराट कोहलीला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तो कर्णधार पद सोडण्यास तयार नव्हता. तरीही त्याच्या इच्छेविरोधात बीसीसीआयने त्याला कॅप्टन पदावरून दूर केले. विराटने आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपण 2023 च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप पर्यंत टीम इंडियाचे कर्णधार राहू असे विराट कोहलीला वाटत होते. मात्र, बीसीसीआयने त्याला हटवून भारतीय क्रिकेट टीमची जबाबदारी रोहित शर्माला दिली.
टी-20 ची कॅप्टनशिप स्वेच्छेनेच सोडली
विराट कोहलीने क्रिकेटच्या टी-20 फॉरमॅटमधून स्वेच्छेने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारचा निर्णय विराट वनडे इंटरनॅशनलच्या बाबतीत सुद्धा घेईल अशी अपेक्षा बीसीसीआयला होती. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. भारतीय टीमने 95 वनडे सामने खेळले. त्यातील तब्बल 65 सामन्यांत विजय मिळवला. तर 27 मध्ये पराभव हाती लागला आणि उर्वरीत सामने ड्रॉ झाले होते. टीम इंडियाच्या विजयाचा सरासरी 68 टक्के राहिला. परंतु, विराट आपल्या टीमसाठी ICC ची ट्रॉफी मिळवण्यात अपयशी ठरला.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टीम-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा कर्णधार होता. भारताने ही सिरीज 3-0 ने जिंकली. या सिरीजमध्ये राहुल द्रविड प्रथमच कोच म्हणून काम करत होता. 2017 नंतर प्रथमच टीम इंडियामध्ये दोन-दोन कर्णधार राहणार आहेत.
यापूर्वी 2014 ते 2017 पर्यंत भारतीय संघात दोन कॅप्टन होते. 2014 मध्ये धोनीने क्रिकेट सोडले. त्यावेळी विराट कोहलीला टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तरीही धोनी शॉर्ट फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून खेळत होता. यानंतर 2017 मध्ये विराटला तिनही फॉरमॅटचा कर्णधार करण्यात आले. आता कोहलीने टी-20 चे कर्णधार पद सोडल्यानंतर
Post a Comment