0

 तडप' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 4.5 कोटींची कमाई केली आहे. ट्रेंड पंडितांच्या अंदाजापेक्षा कमाईचा हा आकडा अधिक आहे. अभिनेते सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे 'तडप'मध्ये एकही मोठा कलाकार नाहीये. विशेष या चित्रपटाच्या कमाईचा आकडा सलमान खान स्टारर 'अंतिम : द फायनल ट्रुथ'च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या आसपास आहे. अंतिमची पहिल्या दिवसाची कमाई 4.75 कोटी इतकी होती.

'तडप'ने 'सत्यमेव जयते 2'ला मागे टाकले
गेल्या आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित झाले. 25 नोव्हेंबरला जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' आणि 26 नोव्हेंबरला सलमान खानचा 'अतिंम: द फायनल ट्रुथ'. सत्यमेव जयते 2 मध्ये जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांच्या भूमिका आहेत. सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असूनही, 'सत्यमेव जयते 2' पहिल्या दिवशी केवळ 3 कोटींची कमाई करू शकला. विशेष म्हणजे 'अंतिम' आणि 'सत्यमेव जयते 2' च्या तुलनेत 'तडप'ला मल्टिप्लेक्सचे फक्त अर्धे स्क्रीन मिळाले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कमाई लक्षणीय आहे.

'सूर्यवंशी'सारखी ओपनिंग कुणालाच मिळाली नाही
कोरोनानंतर चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर 'सूर्यवंशी' हा बॉलिवूडचा सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन मिळवणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन 26.29 कोटी होते. रिलीजच्या चार दिवसांनंतर चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 102.81 कोटी रुपयांची कमाई करून 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला इतकी मोठी ओपनिंग मिळवता आलेली नाही.

Post a Comment

 
Top