उशिरा का होईना पण अखेर न्याय मिळाला. अमेरिकेच्या मिसौरी कारागृहातबंद केविन स्ट्रिकलँड गेल्या आठवड्यात निर्दोष मुक्त झाले. त्यांना तीन लोकांच्या हत्यांसाठी शिक्षा सुनावली गेली होती, ज्या त्यांनी केल्याच नव्हत्या.निरपराध असताना त्यांची ४० वर वर्षे जेलमध्ये गेली. आता ते सुटले तेव्हा अनोळखी लोकांनी ते उर्वरित आयुष्य सन्मानाने जगावेत यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ऑनलाइन मोहीम राबवली. या मोहिमेला यश आले. सुमारे २० हजार लोकांनी आतापर्यंत १४.५ लाख डॉलर (सुमारे १०.७ कोटी रुपये) जमवले आहेत.
मिसौरीच्या अपीलीय न्यायालयाने गेल्या आठवड्यात सुटकेचे आदेश दिले. न्यायालयात स्पष्ट झाले की, स्ट्रिकलँड यांना दोषी ठरवण्यात पुरेसे पुरावे नव्हते. निर्णय बदलल्यानंतरही केविनना भरपाईचा हक्क नव्हता. कारण राज्य चुकीच्या निर्णयामुळे कारावास भोगणाऱ्या अशा लोकांनाच भरपाई देते ज्यांना डीएनए साक्षीच्या माध्यमातून निर्दोष मुक्त केले असावे. स्ट्रिकलँड म्हणाले, त्यांचा १९७८ मधील हत्यांशी काहीच संबंध नव्हता. घटनेच्या वेळी ते घरी टीव्ही बघत होते. गोळीबारात बचावलेल्या मुख्य साक्षीदाराने आपली साक्ष अनेक वर्षे टाळण्याचा प्रयत्न केला. त्याचे म्हणणे होते की पोलिस दबाव आणत होते. स्ट्रिकलँड यांनी निर्दोष सुटल्यानंतर ईश्वराचे आभार मानले.
Post a Comment