0

 तिन्ही कृषी कायद्यांविरुद्ध गतवर्षी २६ नोव्हेंबरला दिल्लीत सुरू झालेले शेतकरी आंदोलन गुरुवारी संपले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या ५ मागण्यांवर पाठवलेल्या प्रस्तावाला संयुक्त किसान मोर्चाने सहमती दर्शवली. प्रस्तावावर मोर्चाच्या बैठकीत २०० शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. यानंतर मोर्चाने पत्रपरिषद घेऊन आंदोलन स्थगितीची घोषणा केली. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, ११ डिसेंबरपासून शेतकरी दिल्ली सोडतील. याच दिवशी विजय दिन साजरा करत सर्व टोल नाके, बॉर्डर रिकाम्या केल्या जातील.

असे झाले एकमत... ५ मागण्यांपैकी तीनवर निर्णय झाला, चौथीवर कायद्यात दुरुस्तीची प्रतीक्षा, पाचवीवर चर्चा बाकी
एमएसपीला कायद्याच्या कक्षेत आणण्यास समिती.
सरकारची बाजू : समिती स्थापली.त्यात संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी, कृषी वैज्ञानिक, केंद्र व राज्यांचे अधिकारी असतील. ज्या पिकांवर एमएसपी सुरू आहे तो कायम राहील.

आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. सरकारची बाजू : हरियाणा, यूपी, एमपी, उत्तराखंड, हिमाचलचे सरकार राजी आहे. दिल्ली व इतर केंद्रशासित प्रदेशांसोबत रेल्वेकडून दाखल गुन्हे तत्काळ मागे घेऊ.

आंदोलनात मृत शेतकऱ्यांच्या वारसांना भरपाई. सरकारची बाजू : यावरही यूपी-हरियाणा सहमत आहेत. पंजाबप्रमाणे या राज्यांतही ५ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे.

नव्या प्रदूषण कायद्यातून सेक्शन १५ वगळावे. सरकारची बाजू : कायद्यातून सेक्शन १५ हटवू.

वीज दुरुस्ती विधेयक सध्या रोखले जावे. सरकारची बाजू : सरकार आता हे विधेयक थेट संसदेत आणणार नाही. आधी त्यावर शेतकरी व संबंधित पक्षांसोबत चर्चा केली जाईल.

आता पुढे काय...एका महिन्याची प्रतीक्षा, नंतर रणनीती आखणार
1.
 ११ डिसेंबरला पंजाबच्या ३२ शेतकरी संघटना सिंघू, टिकरी, गाझीपूरहून एकाच वेळी आपल्या राज्यापर्यंत फतेह मार्च काढतील.
2. १३ डिसंेबरला अमृतसरमध्ये श्री दरबारसाहिबमध्ये दर्शन. १५ तारखेला पंजाबमध्ये ११३ जागी आंदोलनाची सांगता. येथूनच २४ सप्टेंबर २०२० ला आंदोलन सुरू झाले होते.
3. १५ जानेवारीला मोर्चाच्या बैठकीत केंद्राच्या आश्वासनांच्या प्रगतीचा आढावा घेणार.

दिल्लीत २१ व्या शतकातील दोन सर्वात मोठी जनआंदोलने, दोन्ही यशस्वी
1. अण्णांचे जनलोकपाल : एप्रिल २०११ मध्ये रामलीला मैदानावर झाले. कायदा करावाच लागला.
2. शेतकरी आंदोलन : १३ महिन्यांपर्यंत शेतकरी ठाम राहिले. तिन्ही कायदे रद्द करूनच परतले.

बातम्या आणखी आहेत...

Post a Comment

 
Top