0

 आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ३०० जागा मिळतील असे वाटत नाही. कारण सध्या परिस्थिती तशी नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी व्यक्त केले. ते जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये एका सभेला संबोधित करत होते. कलम ३७० वर आपली चुप्पी योग्य असल्याचे सांगताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आझाद म्हणाले, ‘फक्त सुप्रीम कोर्ट (तेथे हे प्रकरण प्रलंबित आहे) आणि केंद्र सरकारच पुन्हा ते कलम लागू करू शकते. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले आहे, त्यामुळे केंद्र ते पुन्हा लागू करणार नाही. मी ते परत आणेन असे म्हणालो तर ते खोटे असेल.

खोटी आश्वासने देणे, कलम ३७० बद्दल बोलणे योग्य नाही. सरकार स्थापन करण्यासाठी ३०० खासदार पाहिजेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमचे ३०० खासदार जिंकतील, असे आश्वासन मी देऊ शकत नाही. काँग्रेसने ३०० जागा जिंकाव्यात अशी प्रार्थना मी करतो. पण तसे घडेल असे मला वाटत नाही.

Post a Comment

 
Top