अमेरिकेत कोरोनाकाळात बंदुकीची मागणी सातपटीने वाढल्याचे दिसून आले. व्हिस्टा आऊडडोअरची रेमिंग्टन व ऑलिनची विंचेस्टर बंदुकांच्या पास ऑर्डरमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. खरे तर २०१८ मध्ये व्हिस्टा कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. परंतु आता कंपनीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे होत आहे. कोरोनाकाळात लोक दूरच्या ठिकाणी प्रवासाला जात आहेत.
अमेरिकेत आऊटडोअरसाठी जाणे याचा अर्थ बंदूक घेऊन शिकारीवर जाणे असा काढला जाताे. आता अमेरिकेत बंदुकांची मागणी वाढली आहे. मागणीचा दबाव प्रचंड वाढला आहे. व्हिस्टा कंपनीच्या अरकन्सास कारखान्यातून रोज तीन ट्रकने पुरवठा करावा लागत आहे. अमेरिकेत बंदुकीच्या डिलिव्हरीच्या आधी ग्राहक बॅकग्राउंड चेक केले जातात. त्याचे प्रमाणही आता ४० टक्क्यांहून जास्त आहे. एनएसएसएफनुसार देशात बंदूक खरेदीच्या पॅटर्नमध्येही मोठा बदल झाला आहे.
६२ टक्के बंदुका श्वेत समुदायेतर लोकांकडे आहेत. २८ टक्के हिस्पॅनिक, २५ टक्के कृष्णवर्णीय, १९ टक्के आशियाई समुदायाचे प्रमाण आहे. २००६ ते २०१९ दरम्यान बंदुकीसाठी परवाना मागणाऱ्यांत महिलांचे प्रमाण १९ वरून २५ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यास पिंक पिस्टल असे म्हटले जाते.
650 घटना घडल्या अमेरिकेत २०२१ या वर्षात
घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांचे दार फर्निचरने बंद केले होते. त्यावर आरोपी म्हणाला, “मी पोलिस आहे. तुम्ही बाहेर येऊ शकता.’ परंतु त्याचा आवाज काहींनी आेळखला आणि खिडक्यांतून उड्या घेतल्या.
अमेरिकेत मंगळवारी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात तीन मुलांची हत्या केली. या घटनेत एका शिक्षकासह इतर आठ जण गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांचे वय १४ ते १७ वर्षे आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
आरोपीने बेछूट गोळीबार केला होता. गोळीबार झाला तेव्हा शाळेत १७०० हून जास्त विद्यार्थी होते. आरोपीच्या वडिलांनी चार दिवसांपूर्वी ऑटोमॅटिक बंदुकीची खरेदी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली होती. आपल्या मुलाच्या ख्यालीखुशालीसाठी पालक मोठ्या संख्येने शाळेच्या आवारात जमले होते. त्यानंतर पोलिसांनी शाळेजवळील एका मॉलमध्ये हलवले आणि काही वेळात त्यांच्या मुलांनाही तेथे सुरक्षित नेण्यात आले.
गोळीबार सुरू होता तेव्हा सगळी मुले घाबरून गेली होती. त्यांनी घाबरून वर्गखोल्यांची दारे लावून घेतली, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसाठी प्रार्थनाही केली. मिशिगन शाळेतील ही घटना अमेरिकेत या वर्षी झालेल्या एकूण गोळीबाराच्या घटनांपैकी २८ वी घटना ठरली आहे. ऑगस्टनंतरच्या गोळीबाराच्या २० घटना घडल्या.
Post a Comment