0

 उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका डॉक्टरने आपल्या संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुशील कुमार असे या डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात पत्नी, मुलगा आणि मुलीचे मृतदेह आढळून आले. डॉक्टरने मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सोडली. त्यामध्ये असे लिहिले होते की कोविडचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या आगमनानंतर, आता आणखी मृतदेह मोजायचे नाही. हा व्हेरिएंट सर्वांना मारुन टाकेल. डॉक्टरने असेही लिहिले आहे की त्याला कोविड संबंधित डिप्रेशन आहे.डॉक्टर सुशीलला अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हा करून तो फरार झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठीवरून, कोरोनाचे नैराश्य आणि ओमाक्रॉनच्या दहशतीमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याचा जुळा भाऊ सुनील यांच्या म्हणण्यानुसार डॉ.सुशील काही काळ डिप्रेशनमध्ये होता.

डॉ. सुशील कानपूरच्या इंद्रनगर येथील दिव्यता अपार्टमेंटमध्ये राहत होते. पत्नी चंद्रप्रभा यांचे वय 48 वर्षे होते. मुलगा शिखर (वय 18 वर्षे) आणि खुशी (वय 16 वर्षे). डिप्रेशनसोबत पोलिस खुनाच्या इतर अंगांनीही तपास करत आहेत.


Post a Comment

 
Top