0

 

ग्राहकांच्या खिशाला कात्री:एअरटेनंतर आता व्होडाफोन-आयडियाने वाढवले प्रीपेड प्लॅन्सचे दर, 25 टक्क्यांनी केली वाढ, 25 नोव्हेंबरपासून होणार लागू

इंधन दरवाढीसह महागाईची मार सहन करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी दणका दिला. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या दरांमध्ये वाढ केल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्होडाफोन आयडियाने दरवाढीची घोषणा केली. व्होडाफोन आयडिया आता आपल्या ग्राहकांना प्रीपेड प्लॅन्ससाठी 20 ते 25 टक्के जादा दर आकारणार आहे.

व्होडाफोन आयडिया (Vi) कंपनीने आपल्या मंगळवारच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये या माहितीचा उल्लेख केला आहे. कंपनीने घोषित केलेले नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन-आयडिया आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. अशात नवीन दरांमुळे कंपनीच्या सरासरी महसूलात सुधारणा होईल असे कंपनीने सांगितले आहे. विशेष म्हणजे, एअरटेलने सुद्धा आपल्या ग्राहकांकडून प्रीपेड प्लॅनसाठी 25 टक्के अधिक दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

 
Top