0

 2016 पासून टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीचा सपोर्ट स्टाफ किंवा कोच बनू शकत्याही वर्तवण्यात येत आहे. मेगा लिलावात भज्जीही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

1998 मध्ये खेळला होता पहिला कसोटी सामना
पंजाबमधून आलेल्या हरभजन सिंगने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याचवेळी भज्जीने 1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचा शेवटचा वनडे सामना 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता.

भज्जीने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले
भज्जी या नावाने प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगने टीम इंडियासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 417 विकेट आहेत. वनडेमध्ये त्याने 236 सामन्यात 269 विकेट घेतल्या आहेत. भज्जीने टी-20 मध्ये भारतासाठी 28 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.

2016 आशिया कपमध्ये खेळला होता शेवटचा सामना
2016 मध्ये हरभजनने आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. आयपीएलमध्ये हरभजनच्या नावावर 163 सामन्यात 150 विकेट आहेत. तो मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे.

41 वर्षीय हरभजन आयपीएलच्या या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. मात्र, त्याला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. हरभजनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता.

Post a Comment

 
Top