0

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रुग्णालयातून गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर अजित देसाई यांनी तशी घोषणा केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी पुढील काही दिवस त्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना मान व मणक्याचा त्रास होत होता. दिवाळीच्या दिवसांत त्यांचा हा त्रास वाढला. एका कार्यक्रमात तर ते मानेला पट्टा लावून बसल्याचे दिसले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले. डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी त्यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते त्यांचे सुपुत्र व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह गुरुवारी सकाळी ते वर्षा या शासकीय निवासस्थानी परतले. रुग्णालयातील काळात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक व कोरोनाविषयक बैठकाना ऑनलाइन हजेरी लावली होती. आता मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी पुढचे काही दिवस घरातूनच कामकाज करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

Post a Comment

 
Top