0

 अमेरिका आता चीनसोबत आण्विक अप्रसार करार करण्यासाठी चर्चेची तयारी करत आहे. पेंटागॉनच्या एका रिपोर्टनुसार चीन २०३० आपल्या ताफ्यात सुमारे १००० अण्वस्त्रे सहभागी करेल. सध्या चीनकडे सुमारे ३५० अण्वस्त्रे आहेत. चीनकडे चांगले तंत्रज्ञान आहे, हीच अमेरिकेला भीती आहे. चीनने नुकतेच डीएफ-१७ हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपटगतीने कोणत्याही लक्ष्यावर मारा करू शकते. अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन आणि चीनचेे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर अमेरिकेने मुत्सद्दी लोकांमार्फत अण्वस्त्र अप्रसाराच्या करारासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांचे म्हणणे आहे की, बायडेन आणि जिनपिंग यांच्यातील बैठकीनंतर अशा कराराच्या पुढाकारासाठी अनुकूल परिस्थिती आहे. परंतु यासाठी चीनकडूनही सकारात्मक संदेश मिळणे गरजेचे आहे. चीनसोबत असा करार झाल्यास आशिया खंडात शांतता निर्माण होईल. परंतु यासाठी अमेरिकेला चीनवर भौगोलिक राजकीय दबाव टाकावा लागेल. बदलत्या समीकरणानुरूप अमेरिकेला रशियापेक्षा चीनच्या वाढत्या सैन्य ताकदीचा धोका आहे.

सर्वात मोठा धोका चीनचे अँटी सॅटेलाइट तंत्रज्ञान
- अँटी सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे चीन अमेरिकेच्या सॅटेलाइट व अर्ली वाॅर्निंग सिस्टिमला पांगळे करू शकतो.
- रशियाप्रमाणेच अमेरिकेकडे चीनसारखी कोणतीच न्यूूक्लिअर हॉटलाइनही नाही.
- चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची दीडशेवर चाचण्या केल्या. अमेरिका ९ ही करू शकली नाही.

Post a Comment

 
Top