0

 भारतीय क्रिकेट टीमचे माजी कोच रवी शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळाशी संबंधित मोठा गौप्यस्फोट केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी BCCI च्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 2014 मध्ये आपल्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले होते असा दावा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.

रवी शास्त्री म्हणाले, "BCCI मधील काही लोकांना मी आणि भरत अरुण कोच म्हणून नको होतो. ज्या पद्धतीने गोष्टी बदलण्यात आल्या. ज्या व्यक्तीला ते बॉलिंग कोच बनवू इच्छित नव्हते, तेच भारतासाठी सर्वोत्कृष्ठ बॉलिंग कोच म्हणून सिद्ध झाले. मी कुणाचेही नाव घेणार नाही. पण, मी हे नक्कीच म्हणू शकतो की मला कुठल्याही परिस्थितीत कोच पद मिळू नये यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात आले होते."

उल्लेखनीय बाब म्हणजे, रवी शास्त्रींना 2017 मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तत्पूर्वी 2014 ते 2015 दरम्यान ते वर्ल्ड पर्यंत ते टीमचे संचालक होते. याच दरम्यान आपल्या विरोधात कट रचण्यात आला होता असे आरोप शास्त्रींनी केले आहेत. याच दरम्यान शास्त्रींना हटवण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट टीमचे तत्कालीन कोच डंकन फ्लेचर यांच्यानंतर शास्त्रीच टीमचे हेड कोच होतील अशी चर्चा होती. पण, ऐनवेळी अनिल कुंबळेला हेड कोच करण्यात आले. कुंबळे यांच्यानंतर रवी शास्त्रींना हेड कोच पदी नियुक्ती मिळाली.

मला वाइट वाटले होते
रवी शास्त्रींच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने एकही ICC ट्रॉफी मिळवलेली नाही. 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम सेमिफायनल पर्यंत सुद्धा पोहोचली नव्हती. तर 2019 च्या वनडे इंटरनॅशनल वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचा न्यूझीलंडने सेमिफायनलमध्ये पराभव केला होता.

शास्त्री पुढे बोलताना म्हणाले, "मला ज्या पद्धतीने टीममधून हटवण्यात आले, त्यातून फार वाइट वाटले होते. मला टीममधून काढायचेच होते तर दुसऱ्या पद्धती पण होत्या. कित्येक वाद झाल्यानंतर मी दुसऱ्या टर्ममध्ये आलो होतो. ज्या लोकांना मी नको होतो, त्यांच्यासाठी ती चपराक होती."

मी आल्याने टीम टार्गेट चेस करायला लागली
रवी शास्त्रींनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेला विजय हा शास्त्रींसाठी पहिलाच होता. रवी शास्त्री पुढे बोलताना म्हणाले, "कोच म्हणून माझा कार्यकाळ पाहिला असता एकेकाळी जी टीम 300 धावांचा पाठलाग करताना 30-40 धावांनी मागे राहायची तीच टीम आता 328 धावा सुद्धा सहज चेस करत होती. एडिलेड टेस्टमध्ये हाच संदेश दिला होता. आम्ही तशाच पद्धतीने चांगल्याप्रकारे खेळू इच्छितो. त्याचवेळी टीमचे कर्णधार पद धोनीकडून विराटकडे आले होते. आणि त्याचवेळी अचानक मला टीममधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. मला कुणी कारणही दिले नाही."

रोहित शर्मावर काय म्हणाले शास्त्री?
दुसऱ्या एका मुलाखतीमध्ये रवी शास्त्रींनी नवीन कर्णधार रोहित शर्मावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये शास्त्री म्हणाले, की रोहित शर्मा जे टीमसाठी बेस्ट असेल तेच करत असतो. तो टीमच्या प्रत्येक खेळाडूंचा पुरेपूर फायदा करून घेतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जगात ऑल फॉरमॅट फलंदाज म्हणून समोर आले आहेत. त्या दोघांवर आपल्याला अभिमान असल्याचे शास्त्रींनी सांगितले.

Post a Comment

 
Top