0

 जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी अवंतीपोरा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी शनिवारी सकाळी शोपियानच्या चौगाम भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.

शुक्रवारीही सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. यासह 36 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवादी मारले गेले आहेत.

अवंतीपोरा येथील चकमकीबाबत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. त्याचबरोबर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक एकत्रितपणे परिसरात शोध घेत आहेत. पथक संशयित ठिकाणाजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहे.

Post a Comment

 
Top