0

 मॅग्दलिना अँडरसन यांनी काही दिवसांपूर्वी केलेली घाेषणा प्रत्यक्षात आली आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्याच्या काही तासांनंतर २४ नाेव्हेंबर राेजी त्यांना राजीनामा द्यावा लागला हाेता. मी पुन्हा पंतप्रधान हाेईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हाेता. संविधानिक पातळीवर वैधतेसंबंधी प्रश्न विचारले जावे अशा सरकारचे नेतृत्व करण्याची माझी इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले हाेते. परंतु पुन्हा देशाची पंतप्रधान हाेईन, असा दावा त्यांनी केला हाेता.

अँडरसन यांची स्पष्टवक्त्या अशी प्रतिमा आहे. त्या स्वत:बद्दल चांगली व कष्टाळू महिला अशी ओेळख सांगतात. परंतु राजकीय क्षेत्रात त्यांच्याकडे कणखर नेता अशा रूपाने पाहिले जाते. एका टीव्ही वृत्तांकनात त्यांचे वर्णन ‘बुलडाेझर’ असे करण्यात आले हाेते. त्या नावाची चर्चा खूप माेठ्या प्रमाणात झाली. त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात १९९६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान गाेरान पेर्साे यांचे सल्लागार यांच्या रूपाने केली हाेती. त्यानंतर त्या सात वर्षे देशाच्या अर्थमंत्री राहिल्या. त्यांनी २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मंडळावर पाॅलिसी अॅडव्हायझरी कमिटीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली हाेती.

या पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. या वर्षी आॅगस्टमध्ये पंतप्रधान स्टीफन लाेफवन यांनी साेशल डेमाेक्रॅकिट पार्टी काँग्रेसच्या प्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिला हाेता. तेव्हापासून कार्यकारी पंतप्रधान म्हणून त्या काम करत हाेत्या. त्यांना पंतप्रधानपदासाठी अत्यंत शक्तिशाली उमेदवारी म्हणून पाहिले जात हाेते.

वडील सांख्यिकीचे प्राेफेसर, आई शिक्षिका
मॅग्दलिना यांचा जन्म २३ जानेवारी १९६७ राेजी झाला हाेता. त्यांचे वडील उपसाला विद्यापीठात सांख्यिकीचे प्राेफेसर आहेत. त्यांची आई शिक्षिका आहेत. मॅग्दलिना यांनी सामाजिक विज्ञान विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी स्टाॅकहाेम स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.

Post a Comment

 
Top