अमेरिकन टेक कंपनी अॅपलने भारताच्या प्लांटमध्ये आपल्या फ्लॅगशिप मॉडेल आयफोन 13 चे उत्पादन सुरू केले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चेन्नईतील फॉक्सकॉन कंपनीच्या प्लांटमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. अॅपल सेमीकंडक्टर चिप विकत घेण्यात यशस्वी ठरले आहे. चिपच्या पुरवठ्याअभावी जगभरातील कंपन्यांना फटका बसला आहे.
भारतात तयार होणारे 30% आयफोन एक्सपोर्ट
रिपोर्टनुसार, अॅपलचे लक्ष्य फेब्रुवारीपर्यंत डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्टसाठी भारतात आयफोन 13 चे कमर्शियल प्रोडक्शन सुरू करणे असे आहे. कंपनीचे लक्ष्य भारतात सर्वात जास्त मागणी असणाऱ्या सर्व मॉडलचे प्रोडक्शन करणे हे आहे. प्रोडक्शनविषयी अॅपल इंडिया आणि फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. भारतात तयार होणाऱ्या आयफोन 13 मॉडलमधून जवळपास 20-30 टक्के एक्सपोर्ट केले जातात. कंपनीनुसार भारतात प्रोडक्शन वाढवल्याने ग्लोबल मार्केटमध्ये त्यांच्या डिव्हाइसचा पुरवठा चांगल्या प्रकारे होईल.
भारतात आयफोनचे उत्पादन सुरू झाल्यानंतर येथील पुरवठ्यातील कमतरता दूर झाली आहे. सध्या, आयफोन 11 आणि आयफोन 12 हे भारतात सर्वाधिक विकले जाणारे अॅपल मॉडेल आहेत. आयफोन 11 आणि आयफोन 12 चे उत्पादन चेन्नईतील फॉक्सकॉन प्लांटमध्ये केले जाते. तर आयफोन SE (स्पेशल एडिशन) बेंगळुरूमधील विस्ट्रॉन प्लांटमध्ये तयार केले जाते.
भारतात आयफोन 13 सीरीजची मागणी वाढली
आईफोन 13 सीरीज सप्टेंबरमध्ये भारतात लॉन्च करण्यात आली होती. आयफोन 13 प्रो आणि 13 प्रो मॅक्स हे देखील देशातील सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहेत. कदाचित याच कारणामुळे अॅपलने आयफोन 13 सीरीजचे प्रोडक्शन भारतात करण्याची योजना आखली आहे. एका अंदाजानुसार, भारतीय ग्राहक 70 टक्के आयफोनचे मॉडेल्स मेड इन इंडिया वापरतात.
Post a Comment