0

 मुंबई हा भारतातील क्रिकेटचा बालेकिल्ला आहे. मुंबईने भारतासाठी एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिले आहेत. या खेळाडूंनी जगभरात जाऊन विरोधी संघाचा पराभव केला आहे. पण, आज याच मुंबईत जन्मलेला एक खेळाडू भारतीय संघासाठी अडचणीचा ठरला. न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एजाज पटेलने भारतीय फलंदाजांना त्यांचाच मैदानात धूळ चारली.

मयंक अग्रवालशिवाय एजाज पटेलची फिरकी भारताच्या एकाही फलंदाजाला समजू शकली नाही. भारताकडून इजाजने सर्व 10 विकेट घेतल्या. भारतात अशी कामगिरी करणारा एजाज पहिला विदेशी गोलंदाज ठरला आहे. कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० बळी घेण्या विक्रम केला होता.

एजाजने 10 विकेट कशाप्रकारे घेतल्या
- एजाज पटेलने शुभमन गिलची पहिली विकेट घेतली. पहिल्या स्लिपमध्ये रॉस टेलरकडे झेल देऊन त्याने किवी संघाला पहिले यश मिळवून दिले.

- 29व्या षटकात एजाजचा चेंडू पुजाराला समजू शकला नाही आणि त्याने पुजाराला बोल्ड करून भारताला दुसरा धक्का दिला.

- पुजाराला बाद केल्यानंतर एजाज पटेलने 29व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय कर्णधार विराट कोहलीला शून्यावर एलबीडब्ल्यू आऊट केले. या विकेटवरही वाद झाला होता. चेंडू बॅट-पॅडवर एकाच वेळी आदळल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले.

- एजाजने सलग दोन चेंडूंवर साहा (27) आणि अश्विन (0) यांना एलबीडब्ल्यू केले. पटेलची हॅटट्रिक हुकली, पण साहा बाद झाल्याने त्याने डावातील ५ बळीही पूर्ण केले.

- भारताकडून 150 धावांची इनिंग खेळणाऱ्या मयंक अग्रवालचीही एजाजने विकेट घेतली. 150 धावा केल्यानंतर एजाजच्या पुढच्याच चेंडूवर मयंकने यष्टिरक्षक टॉम ब्लंडलकडे त्याचा झेल दिला.

- मयंकच्या विकेटनंतर एजाजने अक्षर पटेलला (52) LBW बाद केले. अक्षरला पंचांनी नॉट आऊट दिले, पण न्यूझीलंडने रिव्ह्यू घेतला आणि चेंडू स्टंपच्या रेषेवर आदळत असल्याचे दिसून आले. एजाजची ही 8वी विकेट होती.

- त्यानंतर एजाज पटेलने जयंत यादव (12) आणि मोहम्मद सिराज (4) यांना बाद केले. दोघेही मोठा फटका खेळायला गेले, पण त्यांना पटेलचा चेंडू षटकारासाठी पाठवता आला नाही. यासह एजाजने 10 विकेट पूर्ण करून इतिहास रचला.

मुंबईत झाला जन्म, जडेजासारखी ऍक्शन
एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईत झाला. तो आठ वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला गेले. त्याची अ‍ॅक्शन आणि देहबोली ही भारतीय स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजासारखी आहे. सामन्यादरम्यान एजाजने पाचवी विकेट घेतली तेव्हा त्याने मैदानावर डोके टेकवले.

फलंदाजी करत भारताकडून विजय हिसकावून घेतला
पहिल्या कसोटी सामन्यात एजाज १०व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. भारताला कानपूर कसोटी जिंकता आली असती, पण कोणताही निकाल न देता ती रोमहर्षक पद्धतीने संपली. या सामन्यात किवी संघासमोर 284 धावांचे लक्ष्य होते, मात्र शेवटच्या दिवशी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडने सामना अनिर्णित ठेवला.

सामना अनिर्णित राखण्यात पदार्पणवीर रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी मोठा वाटा उचलला. रचिनने 91 चेंडू खेळले, तर एजाजनेही विकेट वाचवताना 23 चेंडूंचा सामना केला. या जोडीने शेवटच्या विकेटसाठी एकूण 52 चेंडूंचा सामना केला.

Post a Comment

 
Top