0

 दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही नियमांमध्ये बदल होतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होत असतो. यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीस काही महत्त्वाच्या बँकिंग नियमांचाही समावेश असतो. पुढील महिन्यापासून देखील काही नियमात बदल होत आहे. हे बदल तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीसह सामान्यांवर परिणाम करणाऱ्या काही नियमात देखील (Rules Changing from 1st January 2022) बदल होणार आहेत. पुढील महिन्यापासून जे नियम बदलत आहेत त्यात बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder Price) किमती इ. घटकांचा समावेश आहे. जाणून घ्या 1 जानेवारीपासून कोणत्या महत्त्वाच्या आर्थिक नियमात बदल होणार आहेत.PG च्या किमतीत बदल- दरमहा पहिल्या तारखेला एलीपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर (LPG Cylinder Price) जारी होतात. तेल कंपन्या हे दर नवीन महिन्यातही जारी करतील. त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की वर्षाच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढतायंत की कमी होतील.



पोस्ट ऑफिस संबंधित नियम बदलणार- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) अशी घोषणा केली आहे की त्यांनी 1 जानेवारी 2022 पासून ब्रँचमध्ये पैसे काढणे आणि जमा करण्याच्या शुल्काबाबत सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार, 1 जानेवारी 2022 नंतर आता एखादा IPPB चा खातेधारक निश्चित फ्री लिमिटनंतर पैसे काढत किंवा जमा करत असेल तर त्याला अधिक शुल्क द्यावे लागेल.

Post a Comment

 
Top