0

 नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने गांधीनगरमधील फॉरेन्सिक सायन्स लेबोरेटीला (एफएसएल) बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातील डेटा तपासणीसाठी सोपवला होता. त्यापैकी 30 मोबाइल डेटाचा अंतिम अहवाल एफएसएलने एनसीबीला सादर केला आहे. दैनिक भास्करला मिळालेल्या माहितीनुसार, एफएसएलजवळ 84 डिवाइस तपासणीसाठी आले होते, त्यापैकी आतापर्यंत 5 TB डेटा काढला गेला आहे. जर या डेटाचे प्रिंट काढले गेले तर 5 लाखांहून अधिक प्रती असतील.

दोन वर्षांच्या डेटाचा समावेश

एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती, रकुल प्रीत सिंग, करिश्मा प्रकाश, अर्जुन रामपाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडसह अनेक दिग्दर्शक आणि डझनभर ड्रग पेडलर्सच्या 100 गॅझेट्सचा डेटा रिट्राइव्ह करुन तो 2 हार्डडिस्कमध्ये एफएसएलला दिला होता. यात व्हॉट्सअॅप चॅट, फोन कॉल, व्हिडीओ-क्लीपिंग्सच्या दोन वर्षांच्या डेटाचा समावेश आहे.

मरियुआना आणि इतर अंमली पदार्थांसाठी D आणि do सारखे सिक्रेट कोड होते
या डिव्हाइसची चौकशी करत असलेल्या एफएसएलच्या अधिका-याने दैनिक भास्करला नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले की, आतापर्यंत 35 डिवाइसमधून डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. याच डेटावरुन अनेक सेलिब्रिटींनी ड्रग्ज डिलर आणि कॅरिअरसोबत संवाद साधल्याचे समोर आले आहे. या चॅटिंगमध्ये D आणि do सारखे सिक्रेट कोड मारियुआना आणि इतर अंमली पदार्थांच्या डिलिव्हरीसाठी वापरले जात होते.

सेलिब्रिटींच्या डिव्हाइसमध्ये थ्री लेअर लॉक
गुजरात एफएसएलकडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे एकूण 84 डिव्‍हाइसेस आहेत. यात मोबाइल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि डीव्हीआरचा समावेश आहे. ही उपकरणे एफएसएल लॅबमध्ये एकामागून एक अनलॉक केली जात आहेत. तसतशी सेलिब्रिटींची रहस्येही उलगडत चालली आहेत. एफएसएलच्या तपासणीत असेही समोर आले आहे की, सेलिब्रिटींनी फोनमध्ये स्क्रीन लॉक, नंबर कोड आणि त्यानंतर अ‍ॅप लॉक सॉफ्टवेअरसह तीन लेयर कोड ठेवले होते. तर चौकशीवेळी कोणत्याही सेलिब्रिटींनी तपास यंत्रणेला अनलॉक कोड दिला नव्हता. आता एफएसएल त्यांना अनलॉक करत आहे.

सेलिब्रिटींनी मोबाइल अ‍ॅप लॉकसाठी स्वतंत्र पेड सॉफ्टवेअर घेतले होते
अधिका-याने सांगितले की, त्यांना तपासणी दरम्यान असेही आढळले आहे की सेलिब्रिटींनी सेफ्टीसाठी अँड्रॉइड फोन अनलॉक करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान सॉफ्टवेअरही घेतले होते. हे पॅड सॉफ्टवेअर होते, ज्याच्या मदतीने फोटो, स्क्रीन शॉट्स, ऑडिओ आणि व्हिडिओ डेटा, व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस, कॉल लॉग, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल लॉग प्रोटेक्ट केले गेले होते. चॅट आणि स्क्रिन शॉट्समध्ये व्हिड (मारिजुआना) सारख्या गोष्टी दिसल्या एफएसएल अधिका-याच्या म्हणण्यानुसार एनसीबीने त्यांना दिलेल्या फोन चॅट आणि स्क्रिन शॉटमध्ये एका लहान पाउचमध्ये काळ्या रंगाची गोष्ट दिसतेय. ज्याला व्हिड (मारिजुआना) म्हणता येईल. यात अनेक टॅब्लेटची प्रतिकात्मक छायाचित्रे देखील आहेत. एनसीबीदेखील याच आधारे तपास करत आहे


.

Post a Comment

 
Top