0

 पॅरिसमध्ये सध्याला 'फायनांशियल अॅक्शन टास्क फोर्स'ची (FATF) मीटिंग सुरू असून गुरूवारी किंवा शुक्रवारी पाकिस्तानवर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दहशतवादी संघटनांना समर्थन देत आश्रय देणे, अर्थपुरवठा करणे आणि दहशतवाद्यांना मोकळे सोडणे असे अनेक आरोप पाकिस्तानवर आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान सध्या एफटीएच्या ग्रेस्ट लिस्टमध्ये असून काळ्या यादीत टाकल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एफटीएच्या मुख्यालयासमोर हजारो लोकांनी येऊन इम्रान खान सरकार आणि सैन्याविरोधात विरोध प्रदर्शन करत पाकिस्तानाला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.


सर्व जगाला माहित आहे की, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो

मंगळवारी पॅरिसमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शानात पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, युगर समाजातील लोकांनी सहभाग नोंदवला. लोकांचे स्पष्ट म्हणणे आहे की, पाकिस्तानतील सध्याचे सरकार आणि सैन्य उघडपणे दहशतवाद्याला प्रोहत्सान देत असून जगाच्या डोळ्यांत धूळ टाकत आहे. येथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे, दहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करण्याच्या कुरापती चालत असतात. हे जगासाठी धोकादायक असून पाकिस्तानला लवकरात लवकर काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी प्रदर्शानातील लोकांनी एफटीएसमोर केली.

जबाबदारी निश्चित करावी
एफटीएच्या सदस्य देशांना हे सांगायचे की, तुम्ही चीनच्या दबावाला बळी न पडता पाकिस्तानला काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करावा. पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश जगाला धोकादायक बनवत आहेत. यामुळे, लवकरात लवकर पाकिस्तानला काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी पाकिस्तानचे पत्रकार ताहा सिद्दिकी यांनी केली. सिद्दिकी पूढे बोलताना म्हणाले की, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद्यांचे समर्थन करत असून दहशतवादी संघटनांना पैशाचा पुरवठा करतो. आता वेळ आली आहे की, जगाने पाकिस्तान आणि चीनच्या भयंकर षडयंत्राविरोधात कठोर पावले उचलायला हवीत.

दहशतवाद्यांना सोडले जात आहे
जगाला जर सुरक्षित ठेवायचे असेल तर पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांवर नियंत्रण ठेवायला हवे, असे पश्तून चळवळीचे फजल रहमान यांनी सांगितले. ते पूढे म्हणाले की, ज्या देशात पत्रकारांची हत्या करणाऱ्या दहशतवादी उमर शेखला शिक्षा न करता सोडण्यात येते. ओसामा बीन लादेनने याच देशात आश्र्य घेतला आणि त्याच्यासारखे इतरही दहशतवादी पाकिस्तानमध्ये आश्रय घेत आहेत.Post a Comment

 
Top