0

 सैफ अली खान आणि करीना कपूर पुन्हा एकदा आईबाबा झाले आहेत. 21 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये करीनाने आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. 2 दिवसानंतर करीनाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि नवजात बाळासह ती आपल्या नवीन घरी पोहोचली. आता बातमी आहे की, आज करीना आणि सैफच्या त्यांच्या नवीन घरात आपल्या लहान मुलाचे बारसे करणार आहेत. यानिमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या फंक्शनमध्ये चिमुकल्या बाळाचे नाव ठेवले जाणार आहे.

धाकट्या भावासाठी गिफ्ट्स घेऊन पोहोचली सारा

सैफिनाच्या घराबाहेर सजावट देखील करण्यात आली आहे. चाहते, हितचिंतक, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून भेटी येऊ लागल्या आहेत. सारा अली खान देखील तिच्या धाकट्या भावासाठी ब-याच भेटवस्तू घेऊन पोहोचली आहे. तिचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वृत्तानुसार सारा, सोहा अली खान आणि कुणाल खेमू याकार्यक्रमाची तयारी करत आहेत.Post a Comment

 
Top