सन २०२० मध्ये जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी संसर्गाचा धोका असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांचा अभ्यास केला, परंतु रोजच्या जीवनाचा एक भाग बनलेल्या कारबाबत फारसे संशोधन झाले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कारचा आकार छोटा असल्याने त्यात शारीरिक अंतराचे पालन करणे जवळजवळ अशक्य आहे. अशा परिस्थितीत लहान एअरोसोल कण किंवा एअरोसोलद्वारे (श्वास घेताना किंवा बोलताना बाहेर पडणारे छोटे कण) कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका वाढतो. कारमध्ये होणाऱ्या संसर्गाचा धोका जाणून घेण्यासाठी मॅसाच्युसेट्स युनिव्हर्सिटीचे भौतिकशास्त्रज्ञ वर्गीस मथाई आणि ब्राउन युनिव्हर्सिटीमधील त्यांचे तीन सहकारी असिमान्शुदास, जेफ्री बेली आणि केनेथ ब्रेऊर यांनी एका काॅम्प्युटर मॉडेलद्वारे कारमध्ये विषाणू प्रादुर्भाव कसा कमी होऊ शकतो, हे शोधण्याचा प्रयत्न केला.
Post a Comment