0

 अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर वादाच्या भोव-यात अडकलेली रिया चक्रवर्तीला खासगी आयुष्यासोबतच प्रोफेशनल लाइफमध्येही जनतेच्या नाराजीचा फटका सहन करावा लागतोय. एकीकडे तिला चित्रपट मिळत नाहीये, तर दुसरीकडे जे चित्रपट तिच्या हातात आहे, त्यातही तिच्या सीनवर कात्री फिरताना दिसत आहे. ताजे उदाहरण म्हणजे आगामी चित्रपट 'चेहरे'. प्रेक्षकांची नाराजी सहन करावी लागू नये, म्हणून निर्मात्यांनी रियाचा चेहरा पोस्टरवर वापरला नाही. याबाबतीत निर्माते आनंद पंडित आणि दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्यासह चित्रपटाच्या उर्वरित टीमनेही मौन बाळगले आहे. त्यांच्या वतीने कुणी काही बोलण्यास तयार नाही.

रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता
रिया चक्रवर्तीच्या मित्राच्या हवाल्याने स्पॉटबॉयने आपल्या वृत्तात लिहिले की, "आपल्या बाबतीत असे काही घडेल, याचा रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता. 2020 मध्ये रियाला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि आता ती आपले आयुष्य पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता या सर्व गोष्टींचा तिला त्रास होईल. सध्या तिचे बॉलिवूडमध्ये स्वागत नाही, असेच चित्र दिसतंय," असे रियाच्या मित्राने म्हटले आहे.
Post a Comment

 
Top