0

 स्टार प्रवाहवरील 'ललित २०५' या मालिकेच्या निर्मात्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता सोहम बांदेकर स्टार प्रवाहच्याच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. सोहमला अभिनयाची आवड होतीच, मात्र निर्मात्याची जबाबदारी पार पाडत असताना अभिनयाची आवड द्विगुणीत होत गेली. इतर कलाकारांना सेटवर सीन करताना पाहून हा सीन मी कसा केला असता याचा सोहम अभ्यास करायचा. ‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या निमित्ताने अभिनय पदार्पणाचा हा सुवर्णयोग जुळून आला आहे. पीएसआय जय सुवर्णा दिक्षित असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून सोहम सध्या या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतोय.

Post a Comment

 
Top