0

 


विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवणे बेकायदेशीर आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सला ओळखपत्र म्हणूनही मान्यता आहे. यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. आरटीओ ऑफिसच्या चकरा माराव्या लागत होत्या. अनेकांना दलालांची मदत घ्यावी लागत होती. नंतर सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जनतेचा त्रास कमी होऊ लागला. मात्र आता सरकार यात आणखी एक मोठा बदल करणार आहे. वाहन चालवण्यासाठी आता कुणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यासंदर्भात एक तरतूद करत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून एका विशेष योजनेवर काम सुरू आहे. ड्रायव्हिंग टेस्ट न देण्यासाठी मंत्रालय एक तरतूद करत आहे. या तरतुदीनुसार, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरवरून ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. या योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार आहे. मात्र ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.


Post a Comment

 
Top