बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाने बिझनेसमन वैभव रेखाशी लग्न केले आहे. या दोघांचे सोमवारी (15 फेब्रुवारी) मुंबईत हिंदू पद्धतीने लग्न झाले. आता वैभव रेखीची पुर्वाश्रमीची पत्नी सुनैनाची त्यांच्या लग्नाबद्दलची प्रतिक्रिया समोर आली आहे. वैभवची पहिली पत्नी सुनैना लोकप्रिय योगा ट्रेनर आहेत. वैभव आणि सुनैना यांना एक मुलगी असून समायरा हे तिचे नाव आहे. सुनैनाने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले असून तिने एक्स हसबंडच्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या मुलीला या खास प्रसंगी सहभागी होता आले, याचा आनंद असल्याचे सुनैनाने सांगितले आहे.
या व्हिडिओमध्ये सुनैना म्हणाली, "हो, माझ्या एक्स हसबंडने दीया मिर्झाशी लग्न केले आहे. मला अनेकांनी मेसेज केले आहेत. त्यांनी विचारले आहे की मी आणि समायरा ठिक आहे ना? सर्वात पहिले मी तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही मला जवळचे समजले आणि तुम्हाला माझी चिंता वाटली. आम्ही दोघीही ठिक आहोत. इतकेच नाही तर माझी मुलगी तिच्या वडिलांच्या लग्नाबद्दल खूप एक्साइटेड आहे. या खास प्रसंगी समायरा सहभागी होऊ शकली, याचा मला आनंद आहे,’ असे सुनैना म्हणाली.
Post a Comment