0

 क्रीडा मंत्रालयाने मिशन ऑलिम्पिकसाठी आता विशेष माेहिम हाती घेतली. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे ऑलिम्पिकचे खेळाडू तयार हाेतील. हद्रयातील ठाेके खेळाडूंच्या फिटनेसची टक्केवारी स्पष्ट करणार आहे. यात खेळाडूंची तयारी वैज्ञानिक पद्धतीने होईल, ज्यात आहार, जीवनशैलीसह खेळातील सराव या सर्व गोष्टी क्रीडा वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील. सोनिपत येथे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये या सुविधा आहे. साहित्य उपलब्ध होण्यास सुरुवातीचा निधी ४० लाखांदरम्यान आहे. हे क्रीडा केंद्र क्रीडा विज्ञानाच्या आधारावर चालेल.

> व्हिओ २ मॅक्स : याने हृदयाच्या ठोक्याची माहिती मिळते. यामुळे खेळाडूंच्या हृदयाच्या ठोक्यांच्या माहितीआधारे ताे खेळाडू किती तंदुरुस्त आहे हे समजेल.

> हायपोक्सिक चेंबर : असे ठिकाण, जेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. दर्जा उंचावण्यासाठी हे चेंबरफायदेशीर. समुद्रतळाशी ऑक्सिजनचे प्रमाण २०.९ असते, मात्र येथे १०.१ टक्के प्रमाण कमी करत सराव करता येतो.

> क्रायोथेरपी : बाधीत स्नायूना आराम देण्याची प्रक्रिया. यात नुकसान झालेल्या टिशूला बाजूला करण्यास सहायक ठरते. यात १८० डिग्रीपर्यंत तापमान कमी करता येते.





Post a Comment

 
Top