0

 ट्सॲपने जाहीर केलेली नवी प्रायव्हसी पॉलिसी आणि इतर धोरणामुळे केंद्र सरकारही अस्वस्थ आहे. यामुळे आता व्हॉट्सॲपची स्वदेशी आवृत्ती उतरवण्याची तयारी केंद्राने केली आहे. सध्या या दोन्ही अॅपच्या चाचण्या सुरू आहेत.

सध्या यांची नावे “संदेश’ आणि “संवाद’ अशी ठेवण्यात आली आहेत. एनडीटीव्हीनुसार, हे दोन्ही ॲप पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात असतील. ते कधी मार्केटमध्ये उतरतील हे अद्याप निश्चित नाही.

ट्विटरचा प्रतिस्पर्धी ‘कू’ चे युजर्स ४२ लाखांवर
विविध विदेशी ॲपवरून वाद सुरू असताना “कू’ या देशी ॲपचे युजर्स ४२ लाखांहून अधिक झाले आहेत. स्टेटिस्टा या संस्थेच्या पाहणीतून ही आकडेवारी समोर आली. बंगळुरूच्या कंपनीचे हे ॲप अमेरिकी ट्विटरशी चांगली स्पर्धा करते आहे.




Post a Comment

 
Top