0

  21 फेब्रुवारी रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. रविवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लिष्ट कामेही सोपी होतील. सुसंधी चालून येतील.

वृषभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ४
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : २
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : १
नोकरीत वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार केला जाईल.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ३
घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. एकांत हवासा वाटेल.

कन्या : शुभ रंग : लाल|अंक : ७
मोठ्या आर्थिक उलाढाली उद्यावर ढकलणे हिताचे.दूरच्या प्रवासात सावध राहा. वस्तू सांभाळा.

तूळ : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
थोडी मानसिक अस्वस्थता राहील. मानापमानाच्या काही प्रसंगांना तोड द्यावे लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. पत्नीच्याही लहरी सांभाळाल. तब्येत नाजूक असेल.

धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास नको. इतरांचीही मते ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

मकर : शुभ रंग : केशरी| अंक : ३
विविध मार्गाने आलेला पैसा आज विविध मार्गाने जाईल. गरजूंच्या मदतीस धावून जाणार आहात.

कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : १
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : २
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा कार्यउत्साह वाढवतील. गृहिणी मुलांच्या अभ्यासात जातीने लक्ष घालतील.Post a Comment

 
Top