0

 छत्तीसगडच्या राजनांदगावमधील मगरकुंड जंगलात एक मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळली. रात्र असल्याने वन विभागाचे पथक बुधवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याची शिकार झाल्याचा संशय आहे. अज्ञात शिकाऱ्यांनी बिबट्याच्या पुढच्या दोन्ही पायांचे पंजे कापले आहेत. वरच्या आणि खालच्या दातांसह मिशा उपटल्या.

शिकार केली असण्याच्या शक्यतेमुळे वन विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. डीएफओ संजय यादव म्हणाले की, शवविच्छेदनात बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. शरीराच्या काही भागांचा नमुना जबलपूर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला गेला आहे. त्याचबराेबर अचानकमार अभयारण्यातून स्नॅपर कुत्र्यांचे पथक बाेलावण्यात आले आहे. कुत्र्यांनी काही संकेत दिले आहेत.



Post a Comment

 
Top