0

 उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या ऑइल-टू-केमिकल(ओटूसी) व्यवसायाला ग्रुपपासून विभक्त करणे आणि यासाठी एक पूर्ण मालकीची नवी कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. कंपनीनुसार, आगामी वित्त वर्ष २०२१-२२ ची दुसरी तिमाही म्हणजे आगामी सप्टेंबर महिन्यांपर्यंत ओ2सी व्यवसायासाठी नवी कंपनी स्थापन केली जाईल. नव्या कंपनीचे नाव रिलायन्स ओ2सी लिमिटेड असेल.

रिलायन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, नव्या कंपनीत पेट्रोकेमिकल, गॅस, फ्युएल रिटेलिंगसारख्या व्यवसायाचा समावेश असेल. रिलायन्स नव्या सबसिडियरीला २,५०० कोटी डॉलरचे(सुमारे १.८२ लाख कोटी रु.) कर्ज देईल. या रकमेतून सबसिडियरी रिलायन्सचा ओ2सी व्यवसाय खरेदी करेल. मात्र,ओ2सी व्यवसायाचे कर्ज रिलायन्सकडे राहील. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या महसुलात ऑइल-टू-केमिकल्सची ६० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सेदारी आहे. मात्र, आता कंपनी तंत्रज्ञान आणि किरकोळ व्यवसायावर जास्त लक्ष देत आहे.

रिलायन्सच्या शेअरहोल्डिंग स्ट्रक्चरमध्ये बदल होणार नाही
ओटूसी व्यवसायाच्या प्रस्तावित पुनर्गठनाने कंपनीच्या समभाग आराखड्यात कोणताही बदल येणार नाही. शेअरहोल्डिंग पॅटर्न आधीप्रमाणे राहील. कंपनीत प्रवर्तक ग्रुपची हिस्सेदारी ४९.१४ टक्के, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी २४.४९ टक्के आणि अन्य हिस्सेदारी १३.८३ टक्क्याच्या पातळीवर राहील.

पुनर्गठनातून फायदे ..

-कंपनीला सौदी अरामकोसारख्या जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात मदत मिळेल. -ओटूसी व्हॅल्यू चेनमध्ये व्यवसायाच्या संधींचा फायदा उचलण्यात मदत मिळेल. -स्ट्रॅटेजिक पार्टनर्स सहज सोबत येतील.

यामुळे दीर्घावधीत गुंतवणूकदारांसाठी संपत्ती होऊ शकेल
या पुनर्गठनामुळे कंपनीला ओटूसी व्यवसायासाठी स्ट्रॅटेजिक गुंतवणूकदारांची भागीदारी प्राप्त करण्यात मदत मिळेल. रिलायन्स आपल्या ओटूसी अॅसेटमधून पैसा कमावू शकेल. यातून मिळालेल्या रकमेतून पॅरेंट कंपनी आपला ताळेबंद बळकट करण्यासोबत जिओ आणि रिटेल व्यवसायासाठी मूल्यांकन वाढवण्यास मदत मिळेल. ऑगस्ट २०१९ मध्ये कंपनीने ओटूसी व्यवसायाची २०% हिस्सेदारी ७,५०० कोटी डॉलरच्या एंटरप्राइज व्हॅल्यूवर सौदी कंपनी अरामकोला विकण्याची घोषणा केली होती.- एक्सपर्ट अतिश मातलावाला, सीनियर अॅनालिस्ट,एसएसजे फाय.,सिक्युरिटीजPost a Comment

 
Top