बाहुबली', 'क्रॅक', 'रोबोट', 'शिवाजी- द बॉस', 'मेरी जंग', 'विजय द मास्टर' असे अनेक दक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये डब आणि रिलीज झाले आहेत. या चित्रपटांनी हिंदीत डब झाल्यानंतर चांगला व्यवसायदेखील केला आहे. त्यांचे यश पाहता 'चक्र का रक्षक', 'केजीएफ -2', 'पुष्पा', 'रेड', 'हाथी मेरे साथ' असे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. या वाढत्या ट्रेंडमागे अनेक कारणे आहेत. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांची कहाणी हिंदी प्रेक्षकांनी स्वीकारली आहे. याशिवाय लॉकडाउननंतर कोणताही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत नाही, त्याचप्रमाणे दाक्षिणात्य आणि छोट्या बजेटच्या चित्रपटांना थिएटरमध्ये स्थान मिळत आहे.
'चक्र का रक्षक' 900 हून अधिक चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
दिग्दर्शक एस.एम. आनंदन यांचा 'चक्र का रक्षक' हा चित्रपट 19 फेब्रुवारी रोजी 900 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आनंदन यांनी साऊथचा चित्रपट हिंदीत डब करुन थिएटमध्ये रिलीज करण्यामागचे मोठे कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, दक्षिणेतील चित्रपट हिंदीमध्ये डब होण्याचे सर्वात मोठे कारण हिंदी बाजारपेठ खूप मोठी आहे. तसं पाहिले गेले तर टीव्हीवर जे चित्रपट डब करुन रिलीज केले जातात तेदेखील खूप चांगले टीआरपी मिळवतात. आजकाल कोणतेही मोठे हिंदी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत नाहीत, त्यामुळे आपला महसूल वाढवण्याची चांगली संधी केवळ दक्षिणेतील निर्मात्यांनाच मिळत नाहीये, तर दक्षिण भारतातील कलाकारांनाही उत्तर भारतात प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. बाहुबलीच्या आधी प्रभास कोणालाही माहित नव्हता, पण आता त्याचे नाव आहे.
आनंदन पुढे म्हणाले, 'कंटेंट जर चांगला असला तर चित्रपट नक्कीच चालेल. 'चक्र का रक्षक' हा चित्रपट एंटरटेनर आहे, त्यामुळे 900 हून अधिक चित्रपटगृहात तो प्रदर्शित केला जातोय. सध्या साऊथचे अनेक चित्रपट हिंदीत डब करुन ते रिलीज केले जात आहेत, त्यापैकी सर्वप्रथम 'चक्र का रक्षक' 19 फेब्रुवारी रोजी रिलीज होतोय. याशिवाय बोनी कपूर निर्मित आणि अजित, हुमा कुरेशी स्टारर 'वलीमाई', अल्लू अर्जुन, मालविका मोहनन, प्रकाश राज स्टारर तेलुगू चित्रपट 'पुष्पा', प्रभास, पूजा हेगडे, कृष्णम राजू स्टारर 'राधेश्याम', 'केजीएफ -2', 'रेड' हे चित्रपटही रांगेत आहेत.
Post a Comment