इंग्लडविरुद्धच्या चार कसोटी मालिकेतल्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलदांज उमेश यादवला शार्दूल ठाकूरच्या जागेवर संधी मिळाली आहे, पण त्याची निवड फिटनेस टेस्टच्या आधारावर होईल. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणारा तिसरा कसोटी सामना हा अहमदाबामधील मोटेरा स्टेडीयममध्ये किंवा होणार आहे. उमेशने आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरोधात मेलबर्न येथे खेळला होता.
शार्दुलला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज केले जाणार
बीसीसीआयने आपल्या जारी निवेदनात म्हटले आहे की, शार्दुलला देशार्तंगत गट-अ मधील विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी रिलीज केले जाणार आहे. शार्दुलला ऑस्ट्रेलियाविरोधातल्या चार कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातील 11 खेळाडूत जागा मिळाली होती. यात त्याने चांगली कामगिरी दाखवली होती. परंतू शार्दूल हा संघाचा भाग असूनही त्याला इंग्लडविरोधात 11 खेळाडूमध्ये जागा मिळाला नव्हती.
Post a Comment