0

 


लडाखमधील सैन्यांच्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होत असल्याचे चित्र आहे. चिनच्या सैनिकांनी माघार घेतली असल्याचे फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान यावरुन शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच चीन घुसखोरी प्रकरणामध्ये देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले? अशी बनवाबनवी का सुरू राहिली अशा थेट प्रश्न शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला आहे.

'चीन माघारी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदुस्थानी संरक्षण खात्याच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय आहे हे मान्य, पण चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले? प्रश्न इतकाच आहे की, चीनचे सैन्य आमच्या हद्दीत इंचभरही घुसलेले नाही, विरोधक भ्रम आणि अफवा पसरवत आहेत, असे जे गेले वर्षभर सरकारतर्फे सर्वच पातळ्यांवर सांगितले गेले, त्या सर्व थापाच होत्या असेच आता स्पष्ट झाले आहे. चिनी सैन्य माघार घेत असल्याचा उत्सव सरकारनेच सुरू केला. याला कुणी विजयाचा उत्सव म्हणत असतील तर त्यांचे मेंदू तपासायला हवेत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे?'


Post a Comment

 
Top