जगातील हिरे व्यवसायाला गती देण्यात चीन-भारतातील वाढता उच्च व मध्यम वर्गाचे मोठे योगदान राहील. जगभरात हिरे आणि हिऱ्याच्या दागिन्याची मागणी वर्षभरापूर्वी कोविडपूर्व पातळीवर पोहोचेल. अँटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटरच्या(एडब्ल्यूडीसी) दहाव्या वार्षिक अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. हा अहवाल कन्सल्टंट फर्म बेनने तयार केला आहे. त्यानुसार हिऱ्याची मागणी वाढण्यात लॉकडाऊन धोरण, सरकारी पाठिंबा आणि ऑनलाइन सेल्सच्या बाजूने रिटेलर कलाचीही महत्त्वाची भूमिका असेल.
अहवालानुसार, २०२० च्या आधीपासून मंदीचा मार सोसणारा जागतिक हिरे उद्योग कोविड-१९ महामारीमुळे आणखी अडचणीत आला होता. २०२० मध्ये हिऱ्यांच्या उत्पादनात २० टक्क्यांची घसरण आली होती. रफ डायमंड विक्रीतही ३३ टक्क्यांची घसरण आली होती. खनिज कंपन्यांचा नफाही २२ टक्क्यांपर्यंत घटला होता. भारताचा विचार केल्यास लॉकडाऊन, मंदी आणि लग्नावर लावलेल्या निर्बंधामुळे हिऱ्याच्या रिटेल विक्रीत २६ टक्क्यांची घसरण आली आहे. अहवालानुसार, चीनमध्ये हिऱ्याच्या दागिन्याची मागणीत या वर्षी पूर्ण सुधारणा होईल. भारतात हे कोविड-पूर्व पातळीवर आणण्यात चीनच्या तुलनेत थोडा जास्त वेळ लागू शकतो. अमेरिकेतही २०२२-२३ पर्यंत मागणी जुन्या पातळीवर परतू शकते. तज्ज्ञांनुसार, २००९ मध्ये वित्तीय संकटामुळे भारतात जेम्स-ज्वेलरीची मागणी घटली होती.
Post a Comment