0

 ऑस्ट्रेलियाच्या संसदेने गुरुवारी टेक कंपन्यांना बातम्यांसंबंधी आशयाची देवाण-घेवाण करण्यासाठी मोबदला देणे अनिवार्य करणारा कायदा पारित केला आहे. त्यामुळे न्यूज शेअर केल्यास फेसबुक व गुगलला ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमे तसेच प्रकाशकांना यापुढे पैसे मोजावे लागतील. कंपन्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. या कायद्याला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे जगाची या कायद्याकडे नजर होती. मात्र कायद्याच्या अंमलबजावणीला आणखी काही कालावधी लागेल, असे तज्ज्ञांना वाटते. दोन दिवसांपूर्वी ट्रेझर जोश फ्रायडेनबर्ग व फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यात याप्रकरणी सहमती झाली होती.




Post a Comment

 
Top