0

 ऑफिस कामाच्या तासांपैकी निम्म्याहून अधिक काळ बसून काम करण्यात जात असेल आणि त्याची भरपाई म्हणून तुम्ही अर्धा तास सायकलिंग, पायी चालणे अथवा पोहणे यांसारख्या क्रिया करत असाल तरी सावध हाेण्याची हीच वेळ आहे. मग यासाठी थोड्या अंतराने काही हालचाली करण्याची गरज आहे. हार्वर्डशी संलग्न ब्रिंघम अँड वुमन्स हॉस्पिटलचे डॉ. हिचम स्काॅली यांच्या मते, जितका वेळ तुम्ही बसून काम करता, तेवढ्या काळात तुमच्या शरीराचे मुख्य ऊर्जास्रोत असलेले ग्लुकोज स्नायूंना मिळत नाही. त्यामुळे शरीरातील रक्तात शर्करा वाढण्याचा धाेका जास्त असतो. हालचाल न करण्याची सवय इन्सुलिनप्रती तुमच्या शरीराची संवेदना कमी करते. यामुळे सूज वाढते आणि धमन्यांवर चरबीचा थर जमा होतो. उंदरावर केलेल्या एका संशोधनानुसार हालचाल न करण्याची सवय अनेक जिन्सवरही परिणाम करते. यात लिपोप्रोटीन लिपस (एलपीएल) एंझाइमचाही समावेश आहे. चरबी पातळ करून त्यास ऊर्जेत बदलण्यास मदत करतो.

हृदयविकाराचा धोका ३३% नी कमी होईल
६० वर्षे व त्याहून अधिक २६०० ज्येष्ठांच्या सीटिंग हॅबिटचे ९ वर्षे संशोधन केल्यानंतर ही बाब दिसून आली. जे ज्येष्ठ दिवसातून ३ तास सलग बसून काम करतात त्यांच्यात सरासरी ७ तास बसून काम करणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकाराशी संबंधित रोगाने मृत्यूचा धोका ३३ टक्क्यांनी कमी आढळला.Post a Comment

 
Top