0

 करीना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. करीनाने रविवारी मुलाला जन्म दिला. तिला काल शनिवारी रात्री मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करीना आणि सैफने ऑगस्ट 2020 मध्ये दुसऱ्यांदा पालक होणार असल्याची घोषणा केली होती. 2016 ला त्यांनी पहिला मुलगा तैमुर अली खानला जन्म दिला होता.

करीनाने डिलिव्हरीपूर्वीही काम करणे बंद केले नव्हते. शनिवारी ती आपल्या टीम आणि मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टरसह शूटसाठी रवाना होत असताना दिसली होती. दरम्यान ती कोणत्या प्रोजेक्टची शूटिंग करण्यासाठी गेली होती, याविषयी स्पष्ट झालेले नाही.

साराच्या वाढदिवशी केली होती प्रेग्नेंसीची घोषणा
सैफ आणि करीनाने 16 अक्टोबर 2012 ला मुंबईमध्ये लग्न केले होते. 20 डिसेंबर 2016 ला मुलगा तैमुर अली खानचा जन्म झाला. 12 ऑगस्ट 2020 ला सारा अली खान (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी) च्या 25 व्या वाढदिवशी सैफ-करीनाने घोषणा केली होती की, ते दुसऱ्यांदा पालक बनत आहेत.Post a Comment

 
Top