0

 गेल्या अडीच महिन्यांपासून फरार असलेला आराेपी बाळ बाेठे याला पकडा; अन्यथा पाेलिस अधीक्षक कार्यालयात उपाेषणाला बसण्याचा इशारा रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी दिला आहे.

यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० ला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आराेपींना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य सूत्रधार बाेठे पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला अटक होत नसल्यामुळे रेखा यांचा मुलगा रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, बोठेचा ठावठिकाणा सापडत नाही. पोलिस यंत्रणा काय करते, असा प्रश्न पडला आहे. पोलिस का हतबल आहेत? एलसीबीचे अधिकारी सराईत गुन्हेगारास पकडण्यास सर्व यंत्रणा कामास लावतात. मग बोठे वेगळा आहे का? पोलिस अधीक्षक व तपास अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून विचारणा केली असता मुख्य सूत्रधार पकडण्याची हमी त्यांनी दिली नाही. बोठे हा हायकोर्ट, सेशन्स कोर्टमध्ये त्याच्या हितचिंतकामार्फत वकिलपत्रावर सह्या पाठवतो, पण पोलिसांना तो का सापडत नाही? पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदारांना निवेदन देऊनही बोठे सापडलेला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

Post a comment

 
Top