0

 मुंबई हायकोर्टाने मनीष मिश्रा नावाच्या सामाजसेवकाला त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचारणा केली आहे. मनीष मिश्रा यांनी आगामी 'न्याय: द जस्टिस' या चित्रपटा विरोधात याचिका दाखल केली होती. स्वतःला सुशांत सिंह राजपूतचा चाहता असल्याचे सांगणा-या मिश्रा यांनी याचिकेत दावा केला आहे की, सुशांतच्या जीवनावर आधारित हा चित्रपट तथ्यांशी छेडछाड करुन त्याची प्रतिमा मलीन करेल. या याचिकेवर बुधवारी सुनावणी करताना न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी मिश्रा यांना विचारले, "ते काय दाखवणार आहेत हे तुम्हाला कसे ठाऊक?"

चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली

मनीष मिश्रा यांनी दिंडोशी सिव्हिल कोर्टात 22 डिसेंबर 2020 रोजी 'न्याय: द जस्टिस' विरुद्ध याचिका दाखल केली होती, जी कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर मिश्रा यांनी याला हायकोर्टात आव्हान दिले, त्यावर बुधवारी सुनावणी झाली. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे मिश्रा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे अद्याप समोर आलेले नाही. म्हणून निर्मात्यांना 'न्याय: द जस्टिस' हा चित्रपट रिलीज आणि जाहिरात करण्यापासून थांबवण्यात यावे, असे मिश्रा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

विना राइट्स पूर्ण झाले 'न्याय : द जस्टिस'चे शूटिंग
दिलीप गुलाटी यांच्या दिग्दर्शनाखाली 'न्याय: द जस्टिस' चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतशी प्रेरित भूमिकेत दिसणार आहे, तर श्रेया शुक्ला रिया चक्रवर्तीच्या भूमिकेत दिसेल. शक्ती कपूर या चित्रपटात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याशी प्रेरित भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माता अशोक सरोगी यांच्या मते, चित्रपटाची कथा सुशांत सिंह राजपूत यांच्या जीवनापासून प्रेरित आहे. यातल्या मुख्य भूमिकेचे नाव महेंद्र उर्फ ​​माही असे आहे. तर रिया चक्रवर्तीशी प्रेरित भूमिकेचे नाव उर्वशी आहे. ही कहाणी पब्लिक डोमेन असल्याने, तिचे हक्क घेण्याची गरज नव्हती, असे सरोगी यांनी सांगितले.



Post a Comment

 
Top