भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे. येथे आज अभिनेत्री कंगना रनोट हिने भगवान श्रीकृष्ण, त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांचे दर्शन घेतले. कंगना सध्या तिच्या आगामी 'धाकड' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंगपासून ब्रेक घेत ती जगन्नाथ मंदिरात पोहोचली. येथील एक व्हिडिओ कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यात तिच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्थेत दिसतेय.
कंगनाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आपण श्रीकृष्णाला कायम राधा किंवा रुक्मणी सोबत पाहिले आहे. परंतु पुरी जगन्नाथमध्ये भगवान श्रीकृष्ण हे त्याचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा (अर्जुनाची पत्नी, अभिमन्यूची आई) यांच्यासमवेत विराजमान आहेत. त्यांच्या हृदयातील चक्रातून निर्माण होणार्या उर्जामुळे संपूर्ण ठिकाणी निरोगी आणि सुखदायक भावना अनुभवायला मिळते."
Post a Comment