बिग बॉस 14' या शोमध्ये झळकलेली राखी सावंत हिची आई जया यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. राखीने सोशल मीडियावर तिच्या आईचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखीच्या आईला किती वेदना होत असतील याची जाणीव नक्कीच होते. राखीने आईचे फोटो शेअर करत म्हटले, 'कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा, ती कर्करोगावर उपचार घेत आहे'राखी बिग बॉसच्या घरात असताना तिच्या आईवर आयसीयूत उपचार सुरु होते. शोच्या फॅमिली विकेण्ड एपिसोडमध्ये राखीच्या आईने तिच्याशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता, तेव्हा त्यांना कर्करोग असल्याचे समोर आले होते. त्यावेळीदेखील जया या रुग्णालयातच दाखल होत्या. राखीचा भाऊ राकेश सावंतने काही दिवसांपूर्वी टीओआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'आमची आई हॉस्पिटलमध्ये आहे. शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. तिच्या पित्ताशयामध्ये मोठे ट्यूमर आहे ज्यावर शस्त्रक्रिया शक्य नाही. आता डॉक्टर केमोथेरपी सुरू करत आहेत. आम्ही प्रार्थना करत आहोत. की सर्व काही ठीक होईल आणि ती लवकर बरी होईल. "
सध्या राखीच्या आईची केमोथेरपी सुरू आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरात राखी सावंतने चॅलेंजर म्हणून एंट्री केली होती. राखीने बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर तिने 14 लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला. हे मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी वापरणार असल्याचे राखीने फिनालेमध्ये सलमान

खानला सांगितले होते.
Post a Comment