0

 पंतप्रधान २२ फेब्रुवारी राेजी काेलकाता भेटीवर जाणार आहेत. त्यांचा हा एका महिन्यातील तिसरा दाैरा आहे. फेब्रुवारीच्या १८-१९ राेजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगालच्या काकद्वीपमध्ये हाेते. ११ फेब्रुवारीला शहा यांच्या कार्यक्रमाचे कुचबिहार येथे आयाेजन करण्यात आले हाेते. सात फेब्रुवारीला माेदींच्या हस्ते हल्दियात काही विकास याेजनांचे उद्घाटन झाले हाेते. सहा फेब्रुवारीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा नादियात हाेते. तेथे परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली. ३० जानेवारीला शहांनी व्हिडिआे काॅन्फरन्सद्वारे बंगालमधील सभेला संबाेधित केले. २३ जानेवारीला पंतप्रधानांनी नेताजी सुभाष चंद्र बाेस यांच्या १२५ व्या जयंती समारंभात संबाेधित केले हाेते. भाजपच्या तीन आघाडीच्या नेत्यांच्या प्रचाराची ही लहानशी यादी म्हणता येईल. परंतु त्यावरून बंगालमध्ये भाजप व्यापक तयारीने निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे समजू शकते. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याबद्दलची घाेेषणा पुढील महिन्यात केव्हाही हाेऊ शकते.या आधी भाजपने सत्ताधारी तृणमूलचा प्रतिस्पर्धी म्हणून स्वत:ची आेळख मांडली. काँग्रेसचेे राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, साेनिया गांधींसारख्या आघाडीचे नेत्यांपैकी काेणीही बंगालचा दाैरा केलेला नाही.




Post a Comment

 
Top