0

 


दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने पत्रकार प्रिया रमानी यांची मानहानी प्रकरणातून सुटका केली आहे. माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर यांनी रमानी यांच्या विरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. रमानींनी एमजे अकबर यांच्याविरोधात 2018 मध्ये #MeToo कॅम्पेनअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता, तेव्हा अकबर केंद्रीय मंत्री होते. अकबर यांनी रमानींच्या आरोपांचे खंडन करत त्यांच्यीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात निर्णय देताना कोर्टाने म्हटले की, महिलेला अधिकार आहे की, एखाद्या प्रकरणाची ती दशकानंतरही तक्रार दाखल करू शकते.

रमानींनी 'वोग'साठी आर्टिकल लिहीले होते

2017 मध्ये पत्रकार प्रिया रमानींनी ‘वोग’मॅगझीनसाठी एक आर्टिकल लिहीले होते. यात त्यांनी 20 वर्षांपूर्वी नोकरीदरम्यान बॉसवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. 2018 मध्ये जेव्हा देशात #MeToo कॅम्पेन सुरू झाले, तेव्हा रमानी यांनी खुलासा केला होता की, लैंगिक शोषण करणारे एमजे अकबर होते. तेव्हा अकबर मोदी सरकारमध्ये मंत्री होते. या आरोपामुळे 117 ऑक्टोबर 2018 ला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अकबर यांनी यानंतर रमानी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर सुरू झाले #MeToo कॅम्पेन

2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत काही घटना घडली होती. त्यावेळेस तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकर आणि कोरियोग्राफर गणेश आचार्यवर आरोप लावले होते. तेव्हा प्रकरण जास्त वाढले नाही. 10 वर्षानंतर 2018 मध्ये तनुश्री भारतात परतली आणि एका मुलाखतीदरम्यान परत त्या गोष्टीचा उलगडा केला. यानंतर #MeToo कॅम्पेन सुरू झाले आणि यात अभिनेता आलोक नाथ, केंद्रीय मंत्री एमजे अकबर, CPI-M केरलचे आमदार माधवन मुकेश आणि डायरेक्टर विकास बहलवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले होते.

Post a Comment

 
Top