जया बच्चन जवळपास सात वर्षांपासून अभिनयापासून दूर होत्या. आता पुन्हा एकदा त्या अभिनयाच्या विश्वात परत शकतात, असे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठीतील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी मराठी चित्रपटात जया दिसू शकतात. गजेंद्र यांनी जया यांना एका चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग 20 दिवसांत पूर्ण होणार आहे.
चित्रपट निर्मात्यांनी या प्रकल्पाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. लवकरच या चित्रपटाची घोषणा होऊ शकते. जया या रितुपर्णा घोष यांच्या ‘सनग्लास’ चित्रपटात दिसल्या होत्या. यात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारली होती. हा चित्रपट थिएटरमध्ये मात्र प्रदर्शित झाला नव्हता. 2013 मधील 19 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला होता.
पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार जया बच्चन
गजेंद्र आपल्या चित्रपटातील वेगळेपणामुळे ओळखले जातात. विषयांचं वेगळेपण, मांडणीची पद्धत, कलात्मक चित्रीकरण ही त्यांच्या शैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी शेवरी, अनुमती आणि द सायलन्स बिइंग क्रिटिकलसह 50 चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आता त्यांच्या नव्या चित्रपटात जया बच्चन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याने या चित्रपटाविषयीची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जया बच्चनदेखील पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करणार आहेत.
Post a Comment